ससोबा जंगलचे राव- प्रकाश क्षीरसागर

ससोबा खाशेराव 
झाले जंगलचे राव
पाळले वाघ रक्षणास 
हत्तीची अंबारी बसण्यास 
कोल्होबा घालतात पिंगा
चिऊताईचा भोवती दंगा
लांडगोबाला पाहवली
नाही ससोबाची ऐट
जाऊन त्याने मग 
घेतली वनराजाची भेट 
वनराज वाघोबा 
खूप खूप संतापले 
डरकाळी फोडताच 
सगळे धूम पळाले

प्रकाश क्षीरसागर
ताळगाव, गोवा
संपर्क- ९०११०८२२९९

No comments:

Post a Comment