स्वप्न- सुमती कुलकर्णी


सांगा बरं सांगा,
असं जग सांगा,
जिकडे तिकडे असतील, 
आपल्या मनातल्या बागा।।

फुलतील पैसे झाडाला,
उगवतील घरं फांद्यांना,
छोट्यांसाठी नसेल शाळा,
आणि शिंग पक्ष्यांना।।

मी असेन डॉक्टर,
करेन मी समाजसेवा,
कधी असेन हिरोईन,
सर्वांना वाटेल माझा हेवा।।

सगळेच शिस्तीत वागतील,
वाढेल देशाचा मान,
आपल्या या वागण्याने,
प्रत्येकाला मिळेल सन्मान।।

सगळीकडे चॉकलेट्स असतील,
घरसुद्धा चॉकलेटचं,
रस्त्याने सगळे खातील,
चॉकलेट नव्या फ्लेवरचं।।

हे सगळं स्वप्नातलं,
खरं कसं होणार?,
पण स्वप्नात तर मला,
जे हवं ते मिऴणार।।

- सुमती कुलकर्णी
इयत्ता- नववी
विद्या प्रबोधिनी प्रशाला, नाशिक

1 comment:

  1. सुमती - खूप छान लिहू शकतेस तू, या पुढे ही जरूर लिहित जावे .

    ReplyDelete