हरवलेले बालपण- देवेन सोनार


सूर्याच्या प्रकाशात पूर्वी फुलत होते फूल।
खेळाच्या मैदानी आता दिसत नाही मूल।।
आनंदाच्या फांदीवरचं फूल आता कोमेजलंय।
आधुनिकतेच्या ओझ्या खाली बालपण हरवलंय।।

अभ्यास एके अभ्यासाचा पाढा आम्ही वाचला।
खेळाला कायमचा आम्ही पूर्णविरामंच लावला।।

बाबांनी सांगितले आता अभ्यासाशी गट्टी।
खेळाच्या मैदानाला द्या आता थोडी सुट्टी।।
सदाहरित वृक्षानेदेखिल शुष्क रूप घेतलंय
आधुनिकतेच्या ओझ्याखाली बालपण हरवलंय।।

मोबाईल आणि दूरदर्शनशी आम्ही केली मैत्री।
पण खरे पाहता त्यांशिवाय दुसरा नाही वैरी।।
क्रिकेटचा आस्वाद आता मोबाईल वरून मिळतो।
मनोरंजन करण्यासाठी टी. व्ही हजर असतो।।
बालपणातच रोगराईचं प्रमाण आता वाढलंय।
आधुनिकतेच्या ओझ्या खाली बालपण हरवलंय।।

आधुनिकतेने बालपणाचे पालटले हे दृश्य।
परिणामतः आम्ही गमावले मोलाचे आरोग्य।।
पाहता-पाहता बालपणाचं रूप आता पालटलंय।
आधुनिकतेच्या ओझ्या खाली बालपण हरवलंय।।

जीवनाच्या यशस्वीतेची किल्ली आहे बालपण।
योग्य वापर झाला तर उजळून टाकेल प्रत्येक क्षण।।
अभ्यासाचादेखील कंटाळा नसावा।
दूरदर्शन व मोबाईलसंगे शारीरिक खेळ असावा।।
संस्कारांच्या टंचाईने बाल मन करपलंय।
आधुनिकतेच्या ओझ्या खाली बालपण हरवलंय।।

- देवेन सोनार
मनोर, पालघर

5 comments:

  1. नमस्कार देवेन - रास्त खंत आहे ही.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर देवेन असाच रमत राहा छान विचारणी

    ReplyDelete