पाटीवरती हात- प्रमोद चांदेकर


पाटीवरती लिहितो
बाळ अ....आ...ई,
हुश्शार म्हणून त्याचे
गाल कोचतात बाई....

बाजारातून बाळाला
आणून दिली आहे पाटी,
हळूहळू अक्षरे तो
काढतो छोटी-मोठी....

भल्या मोठ्या हत्तीचे
काढतो वाकडे पाय,
लांबच लांब सोंड नि
काढतो काय...काय....

कधी कधी बाळाचा
अभ्यास जातो पुसून,
बाळ मग नाराज होते
बसते गप्पच रुसून....

ओल्या कापडाने तो
रोजच पाटी पुसतो,
गिरवून पाटी पुन्हा 
गोड गालात हसतो....

पाटीवरची अक्षरे 
गिरवत असतो हात,
ज्ञानाच्या प्रवासाची
तिथेच होते सुरुवात....

पाटीवरती लिहूनी
अज्ञान दूर सरते,
कौतुकाची थाप रे
पाठीवरती पडते....

प्रमोद चांदेकर
मलगड/ चंदगड
संपर्क- ८५३०८४९९५६

1 comment:

  1. नमस्कार प्रमोद जी - छान कविता .

    ReplyDelete