रुजवल्या मनी- संगीता गुरव

कसं सांग आईउगवतं झाड
कोण ग करतं त्याची वाढ?
आईने मग आणल्या बिया
राजूला म्हणालीचल लावूया।
बिया झाल्या मातीत गुडूप,
बघत बसला राजूही चिडीचूप।
रोज पाणी घालताना आई मातीला सांगी,
राजूच्या बियांना येऊ द्या वांगी।
एक दिवस मातीतून फुटला कोंब,
हरखला राज़ू वाढला जोम।
बघता बघता वाढले झाड ,
काळेभोर काटेरी वांग्यांची वाढ।
वांग्याची भाजी नावडती,
राजूची झाली आवडती।
आईचे झाले फत्ते काम,
रुजवल्या मनी बिया जाम।

संगीता गुरव


2 comments: