वेळीच डोळे उघड...-एकनाथ आव्हाड



जरा कुठे दुपारचा डोळा लागलातर हा आमचा दिवटा चिरंजीव हातात बॅट घेऊन खेळाचं मैदान गाठायला एका पायावर तयार!
काय रे मागच्या परीक्षेत क्रिकेटमधील बाॅलसारखे गोलावर गोल भोपळे मिळालेतरी अजून डोळे उघडले नाहीत तुझेथांब! थांब! तिथंच थांब! ऐकले न ऐकले करून भर दुपारचा घरादाराचा डोळा चुकवून कुठे निघालासक्रिकेट खेळायला?
मागच्या परीक्षेत एवढी विकेट गेली पण त्याचं तुला काही नाही. आणि काय रेक्रिकेट खेण्यासाठी डोक्यावर गाॅगल कशाला तो?
काय म्हणतोसबाहेर खूप ऊन आहे. गाॅगलमुळे तेवढंच डोळ्यांचं संरक्षण.
पण मी म्हणतोउन्हा-तान्हात जावंच कशाला बाहेरबसावं ना घरात गप्प. अभ्यास म्हटलं की डोळ्यावर झोप येते.
गाॅगल लावून काय ते ध्यान दिसतंय. काढ ती डोळ्यांवरची झापडं आधी!
म्हणे,  गाॅगल म्हणजे डोळ्यांचं रक्षण. कवचकुंडलंच जशी. चल जाआतल्या खोलीत. वाचत बस.
कायवार्षिक परीक्षा झाली. खेळाचेच दिवस आहेत आता. 
वा! वा! विद्वान आहात राजश्री! आता बरं पोपटासारखं बोलता येतं. मग शाळेतच उत्तरं देताना का दातखीळ बसतेत्यावेळी डोळ्यांपुढे मात्र काजवे चमकत असतील. 
काय म्हणतोसकाजवे चमकत नाहीत
डोळ्यांपुढे एकदम अंधारी येते त्यावेळी.
तोंड वर करून हे सांगायला लाज वाटत नाही तुलालक्षात ठेवतुझ्या ह्यावेळच्या वार्षिक परीक्षेच्या रिझळ्टकडे डोळे लावून बसलोय मी. घोडामैदान जवळच आहे. गड्यानापास तर होमग काढतो तुझा खेळ एका फटक्यात! तुझ्या डोळ्यांदेखत बॅटीचे नाही दोन तुकडे केले तर बघ.
अरेमी हे सगळं तुला बोलतोय हे तुझ्या भल्यासाठीच. तुला असं टाकून बोलणं मला अजिबात आवडत नाही. मलासा क्लेष होतात. 
तू चांगला वागलासमन लावून खेळतोस तसाच मन लावून अभ्यास केलास तर तुझीच प्रगती होईल. माझं बोलणं तुला कटू वाटत असेलपण तुला दुखावण्याचा मुळीच हेतू नाही. 
ही बॅट फारच जुनी झाली आहे रे! माझ्या सचिनला नवी कोरी बॅट घेऊ. होय... होय.. माझा सचिनच आहेस तू.

एकनाथ आव्हाड
चेंबूरमुंबई
eknathavhad23@gmail.com

1 comment:

  1. सर नमस्कार - लेखन शुभेच्छा .

    ReplyDelete