समुद्री सफर- अनन्या वेलणकर


     अंदमान-निकोबारच्या एका बेटावरील नारळाच्या झाडावर अॅना व मरिया नावाच्या दोन बहिणी बसल्या होत्या. त्या त्यांच्या दुर्बिणीने इकडे तिकडे पाहात होत्या. तेवढ्यात त्यांना दूरवर एक रंगीबेरंगी ठिपका दिसला. त्या ठिपक्याच्या मागे जाण्याचं त्यांनी ठरवलं. पटकन झाडावरुन उतरून घरी गेल्यात्यांनी आपल्या आई-बाबांना विचारलं, की आम्ही होडीने पाण्यात फिरायला जाऊ का? बाबा म्हणालेतुम्ही जा..पण कुंपण ओलांडू नका.
     अॅनाने व मरियाने बाबांकडे दुर्लक्ष करून प्रवासाची तयारी सुरू केली. मध्यरात्री तराफा घेऊन निघाल्या. कुंपणाला वळसा घालून पुढेही गेल्या. वादळ गडगडायला लागतं. वीज कडाडत असते. तेवढ्यात एका मोठ्या लाटेबरोबर मोठ्या शार्कचा फटकारा बसतो. बोट उलटते. त्या दोघी जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा त्या एका मोठ्या बेटावर असतात. शेकोटी करतात आणि त्या बेटावरील मिळणाऱ्या भाज्या खातात. नवीन तराफा बनवून परत निघतात. तेवढ्यात त्यांना असा आवाज आला......खच्.. खच्... खच्....त्यांच्या तराफ्याच्या दांड्याला मागे दोरी असलेले काही बाण येऊन घुसले. ते बाण एका मोठ्या जहाजावरून मारले गेले होते. व त्या दोरांच्या साहाय्याने काही सैनिक तराफ्याकडे येऊ लागले. त्या दोघींनी पटकन स्वतःकडच्या सुऱ्याने दोर कापून टाकले. आणि तराफा जोरात सोडला. दुपार झाली होती. मरिया म्हणाली, ‘ताई, मला भूक लागली आहे.’ अॅना म्हणाली, “तू तराफा ह्याच भागात चालवत राहा. मी येतेच”. आणि तिने पाण्यात उडी मारली. तिच्या दोन्ही हातात, एक एक सुरा होता. ती एक मासा मारून परत येतच होती. तेवढ्यात, तिला आठवलं की, मरिया काही मासे नाही खाणार. म्हणून तिने ४-५ समुद्री वनस्पती उपटून सोबत नेल्या. पण तराफ्यावर येते तर काय!!! मरिया मासे खायला तयार!! खाऊन झाल्या झाल्या पुन्हा त्यांना तराफ्याच्या बाजूला रंगीबेरंगी ठिपका दिसला. त्यांनी तो पटकन उचलला. पाण्यातल्या शिळेला तराफा बांधला. लांबून चमकणारा व लहान वाटणारा ठिवका म्हणजे एक चांगली वस्तू होती. त्याची न्याहाळणी सुरू केली. त्यांना असं दिसलं, की त्याच्यात एक चिट्ठी अडकली होती. त्यात जो मजकूर होता तो अंटार्क्टिक महासागराच्या राजाने पाठवलेला होता. मजकूर असा होता की, ‘मी प्रशांत महासागराच्या राणीला हरवून तिचा हा दगड पाण्यात फेकून दिला आहे.’ तो मजकूर घेऊन त्या घरी निघाल्या. तेवढ्यात अॅनाला असं कळलं, की त्या प्रशांत महासागरात आहेत. बराच वेळ त्यांनी प्रवास केला. वाटेत एका बेटावर थोडी विश्रांतीही घेतली. तिथेच एक सागरी नृत्य सुरू असते. ते नृत्य त्यांनाही करायची इच्छा होते. व त्याही तो नाच करतात. हातांच्या हालचालींना अनुरूप अशाच लाटाही समुद्रातून येत असतात. त्यांना आश्चर्य वाटते. व अचानक, घू.........घू........असा आवाज येऊ लागतो. त्या घाबरतात. व पुन्हा एकमेकींना धीर देत आवाज ऐकतात, आता कोणीतरी बोलत असतं, “तुम्ही दोघी......तुम्ही दोघी... प्रशांत महासागराच्या राण्या आहात.” त्या दोघींना विश्वासच बसत नाही. आम्ही राण्या? कसं शक्य आहे? परतीचा प्रवास पुन्हा सुरू होतो. घरी सगळे वाट पाहात असतात. आई-बाबांना झालेला सगळा प्रकार सांगतात. त्यांनाही खूप आश्चर्य वाटतं. त्या दोघींना पुन्हा जाणं आवश्यक असतं. त्या पुन्हा समुद्राकडे जाऊ लागतात. प्रशांत महासागराच्या राण्यांमुळे, समुद्रही त्यांना आपलंसं करून घेतो. त्या आत-आत जातात. जलसृष्टी त्यांचं स्वागत करते. एक सागरी महाल त्यांच्यासाठी असतो. तिथे, डाॅल्फिन, खेकडे व इतर मासे येऊन त्यांना एक- एक समुद्री शक्तीची तलवार देतात. सागरी वादळं, इतर संकटांपासून ही तलवार त्यांचं रक्षण करते. ह्या तलवारींच्या मदतीने त्या अंटार्क्टिक महासागराच्या राजालाही हरवतात. घरी परतून सामान्य मुलींसारख्या पुन्हा त्यांच्या किनारी खेळू लागतात. पण ही शक्ती त्यांच्यासोबत सदैव राहते. ती त्यांना पुन्हा महाली घेऊन जाते.

अनन्या वेलणकर
इयत्ता- तिसरी
डीएसके स्कूलपुणे

1 comment: