आजोबांनी बांधलं सुंदर तळं
आज्जी म्हणायची आनंदडोह!
तळ्याभोवती लावली सुंदर झाडं,
साऱ्याजणांना त्यांचं वेड।
मुले सोडती कागदी नाव
पोहण्यास आले तिथे बेडूकराव।
कासवाला मिळाली कुठून वर्दी
छोट्या-छोट्या माशांनी केली गर्दी।
सुंदर बदके तळ्यांत पोहती
माना डोलवत जाती- येती।
मोहक कमळे फुलेच उमलली
तळ्याची त्या कळीच खुलली।
हळूच स्पर्शून गेले वारे
सोबतीला आकाश, पक्षी- पाखरे।
तळ्याचे नातेवाईक नाचणारी पोरे
निळ्याशार पाण्यालाही आवडायचे सारे।
-संगीता गुरव
सातारा
सातारा
नमस्कार संगीता - खूप छान आहे कविता .
ReplyDeleteपशुपक्षी,मुले असे सगळेचजण किती छान आनंदी झाले आहेत.
ReplyDeleteवाचकांनाही ह्या आनंदडोहात डुबकी मारायला मिळतेय.
सुंदर !
Khup chan Kavita dear Sangita mam
ReplyDeleteसंगीता अप्रतिम कविता.याच प्रकाशन झालच पाहिजे. तुझ्या कविता एकदिवस सगळ्यांच्या तोंडी असतील मना मनात वस्तीला. बापू
ReplyDelete