शेंगांच्या फराळासाठी
मुलं झाली गोळा,
तेवढ्यात तिकडून आल्या
खारुताई सोळा।।
झुबकेदार शेपट्या त्यांच्या
लुकलुकते डोळे,
हालचालीतून त्यांच्या
वीज सळसळे।।
कौतुकभरल्या नजरांनी
मुलं, पाहत बसली मस्त,
तेवढ्यात सगळ्या खारुताईंनी
शेंगा, केल्या की हो फस्त।।
- राधिका कुलकर्णी
मुक्त पत्रकार
- राधिका कुलकर्णी
मुक्त पत्रकार
राधिका - नमस्कार , छान गंमत -कविता .
ReplyDeleteChan!
ReplyDelete