पक्षीमित्र मी पक्षीमित्र मी,
ध्यास त्याचा सदैव मनी।
कूजन गुंजन रिझवते मन,
अंतरात त्याची असते खूण।
शहरांच्या देशा कसे त्यांचे घर?
रोज पडते त्यात नवी भर।
सहज सुंदर गर्द वाटा,
तयांच्या घेती ठाव मनाचा।
गर्द रानराई तयांना वरदान,
मनुष्यास राहावे साहचर्याचे भान।
दूरस्था ते कूटस्थ व्हावा अपुला प्रवास,
पृथिवीमातेचे आम्ही सहोदर।
पुढे वाहावे हे संचित। पुढे वाहावे हे संचित।
-सायली गणपुले
इयत्ता- नववी
गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे
छान आहे कविता! अभिनंदन!
ReplyDeleteसायली - खूप छान लिहिलीस कविता .
ReplyDelete