नेहमीप्रमाणे ऋषी खेळायला गेला गार्डनमध्ये. अरेच्चा! ओळख करून द्यायला विसरले, अहो ह्याचं नाव ऋषभ, वय वर्षे पाच. आम्ही घरी सगळे ह्याला ऋषी म्हणतो. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' ही म्हण ह्याला पुरेपूर लागू होते. आमचं शेंडेफळ असल्याने सगळ्यांचा लाडका तर... आज तो खेळून घरी परतला तेव्हा त्याच्या हातात मी एक डबा पाहिला, कुतूहलाने त्याला विचारले, “काय आहे ह्या डब्यात?” चेहऱ्यावरच्या मिस्कील हास्याने तो म्हणाला, “मम्मा,स्नेल!” त्याची एक्साईटमेंट एवढी की, मला म्हणाला "ह्या डब्याला टू ऑर थीर होल्स बनव.” ऋषी असाच सगळ्या भाषांची खिचडी करून बोलतो.
तर मी त्याला होल्सकरून दिलेसुद्धा आणि विचारले, “अरे, पण कशासाठी?” त्यावर कपाळावर हात मारत तो म्हणाला, अगं मग ऑक्सीजन कसा मिळणार स्नेलला ब्रीद करायला?” तसा.. हा काही आश्चर्याचा धक्का नव्हता मला, कारण ऋषी असे बाउंसर्स रोज टाकत असतो. मान हलवून मी नुसती त्याच्याकडे पाहात होते. थोड्यावेळाने त्याने गॅलरीत त्या कुंडीमधली दोन पाने तोडून डब्यात टाकली आणि म्हणाला तिला भूक लागली असेल ना!
तर मी त्याला होल्सकरून दिलेसुद्धा आणि विचारले, “अरे, पण कशासाठी?” त्यावर कपाळावर हात मारत तो म्हणाला, अगं मग ऑक्सीजन कसा मिळणार स्नेलला ब्रीद करायला?” तसा.. हा काही आश्चर्याचा धक्का नव्हता मला, कारण ऋषी असे बाउंसर्स रोज टाकत असतो. मान हलवून मी नुसती त्याच्याकडे पाहात होते. थोड्यावेळाने त्याने गॅलरीत त्या कुंडीमधली दोन पाने तोडून डब्यात टाकली आणि म्हणाला तिला भूक लागली असेल ना!
तर ऋषभने आत्तापर्यंत स्पायडर, फूलपाखरू, स्नेल असं कलेक्शन केलंय. रिकाम्या पेपर ग्लासमध्ये टेबलावर बसलेल्या माशा तो झटक्यात ट्रॅप करतो. रस्त्यावरून चालताना मांजर किंवा कुत्र्याचं पिल्लू दिसलं तर वॉटरबॉटलमधलं पाणी आणि टिफिनमध्ये मुद्दाम नेलेली बिस्कीट खाऊ घालतो. सगळ्या प्राण्यांवर, कीटकांवर त्याचं जीवापाड प्रेम. झूरळ जरी दिसलं तरी न मारता दाराबाहेर सोड म्हणतो. आत्ता कालचाच किस्सा बिस्कूट खातान घरी थोडं खाली नकळत पडलं. त्याला काही वेळाने मुंग्या लागल्या. तर आम्ही रिएक्शनने म्हटलं, “अरेरे मुंग्या चावतील आता!” तर ॠषी म्हणाला, “अरे त्यांना भूक लागलीय, खाऊ दे ना."मग काय नुसते पोट धरून हसलो आम्ही.
झाडांवरदेखील ऋषी तितकेच प्रेम करतो. आमच्या गॅलरीत बटाटा, कोथिंबीर, कांदा अशा ऋषीने लावलेल्या झाडांना सकाळी उठल्यावर न चुकता पाणी घालतो. तो आता एवढं सगळं करून हा अभ्यास कधी करतो असा प्रश्न पडला असेलच. तर ऋषी अभ्यासदेखील मन लावून करतो. त्याचं सुवाच्य अक्षर सगळ्यांचं लक्ष वेधतं. असा आमचा हुशार, नॉटी, हसरा ऋषी, याला क्रिकेट खेळून इंडियन टीममध्ये जायचंय. हातात बॅट धरून तो एकच प्रश्न विचारतो. “मी विराट कोहलीसारखा दिसतोय ना?”
अशा आमच्या मनमिळावू ऋषीचे अनेक किस्से आहेत. ऋषी म्हणतो तसं, “सगळ्या मुलांनी खूप खेळायचं असतं, खायचं असतं. थोडा अभ्यासपण करायचा असतो. मगच आपण विराट कोहली बनतो!”
नमस्कार - छान गोष्ट ऋषीची .
ReplyDeleteप्राण्यांवर, कीटकांवर प्रेम करणारा, क्रिकेट खेळणारा आणि तरीही अभ्यास करू शकणारा ऋषी. छानच!
ReplyDeleteMy Family and Other Animals हे Gerald Durrell ह्यांचं धमाल पुस्तक आहे. त्यातले काही किस्से ऋषीला वाचून दाखवा.