आनंदाचे झाड- गीता विद्वांस


आई पाहा! मी आज अंगणी आनंदाचे झाड लावले.
रोज पाणी घालता घालता त्याला, 
विशाल होईल मनी कल्पले.
या झाडावर रोज, मनोहर पाखरांचे थवेच येतील.
चिमण्या-राघू-फूलपाखरे सगळे येथे सुखे नांदतील.
रंगीत इवली सोनपाखरे रोज सकाळी दारी येतील.
दाणे मूठभर टिपून मागे, नवे गीत शिंपून जातील.
त्या गीतांच्या गोड स्वरांनी रोज सकाळी जागे व्हावे,
त्या पक्ष्यांना रोज भेटूनी शाळेसाठी पुढे निघावे.
पक्ष्यांची त्या कुठली शाळा, कसले दफ्तर, कुठली वेळा,
आनंदाच्या या झाडांना फुले फळे गं कसली येतील?
रंग कोणता गंध कोणता कितीक कल्पना मनात घुमतील,
ऊठ सोनुले, सहा वाजले, अरे! काय हे स्वप्न भंगले!
कुठली पाखरे आणिक गाणी, झाड लावले कुणी अंगणी,
आनंदाच्या झाडाची ही निव्वळ होती स्वप्नकहाणी!!
निव्वळ होती स्वप्नकहाणी!!

- गीता विद्वांस

1 comment: