दिवाळीची मज्जा- अरुण वि. देशपांडे


आवडे मजला सण दिवाळीचा 
दूर करी अंधारा, सण प्रकाशाचा ....

दिवाळीची मज्जा अशीपण करू 
अशा मित्रांच्या घरी आपण जाऊ  
नाही होत ज्यांची दिवाळी साजरी 
फटाके खाऊ भेट देऊन येऊ ....

दिवाळीची मज्जा पाहुणे येती घरी 
गप्पा गाणी खेळ खूप खेळू भारी 
आबा-आजी रोज आठवणी सांगती 
ऐकण्यात गोष्टी मुले छान रंगती ..

आई बनविती पदार्थ छान किती 
चव ती तिच्या हाताला सांगू किती 
लाडू ,चिवडा नि,खमंग चकली 
पोरांनी कितीदा तरी फस्त केली 

आवडे मजला सण दिवाळीचा
दूर करी अंधारा, सण प्रकाशाचा .....

अरुण वि. देशपांडे, पुणे.
मो-९८५०१७७३४२ 






5 comments:

  1. छानच, निरागस कविता आहे. अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय बद्दल धन्यवाद

      Delete
  2. खूपच छान वर्णन

    ReplyDelete
  3. अभिप्रायबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. मा.संपादक- चंमत ग- ई-दिवाळी अंक-2018, कविता प्रकाशित केल्याबद्दल आभार.लेखन सहकार्य नेहमीच असेल, संपर्क साधावा.

    ReplyDelete